आलापल्ली येते टायगर ग्रुपच्या कार्यालयाचे राजेंच्या हस्ते मोठ्या थाटात शुभारंभ.
गरजूंच्या मदतीसाठी सदैव तत्पर.. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी दिली ग्वाही.
अहेरी,
रक्तदान तथा सामाजिक क्षेत्रात अहेरी विधानसभा क्षेत्रात सदैव अग्रेसर असणारे टायगर ग्रूपचे आलापल्ली येतील मध्यवर्ती कार्यालयाचे शिव जयंतीच्या मुहूर्तावर अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम ह्यांच्या शुभहस्ते काल शुभारंभ करण्यात आले..!!
रुग्णवाहिका तथा अनेक सामाजिक उपक्रमांसाठी टायगर ग्रुप अहेरी विधानसभा क्षेत्रात मोठे प्रसिद्ध आहे, लोकांना योग्य वेळी योग्य मदत मिळावे ह्यासाठी आलापल्ली येते ह्या कार्यालयाची सुरुवात करण्यात आली आहे, ह्यावेळी राजे साहेबांनी टायगर ग्रुपच्या कार्याची स्तुती करीत त्यांच्या आगामी कार्याबद्दल सविस्तर चर्चा केली, मी तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार असून गरजूंच्या मदतीसाठी आपण सदैव तत्पर राहणार असल्याची ग्वाही ह्यावेळी राजे साहेबांनी टायगर ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
0 Comments