गडचिरोली,
मौजा सगनापूर ता. चामोर्शी, जि. गडचिरोली येथे विर शिवाजी क्रीडा मंडळ सगनापूर द्वारा आयोजित भव्य डे-नाईट कबड्डी सामन्यांच्या उदघाटन सोहळ्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन बोलतांना महाराष्ट्र प्रदेश कॅांग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॅा. नामदेव किरसान यांनी युवकांना व खेळाडूंना उद्देशून व्यसनमुक्त राहण्याचा सल्ला दिला. गुटका खर्र्याचे व्यसन सुद्धा अत्यंत वाईट असुन कॅसंर सारखा रोग विकत घेण्यासारखे असुन तो बरा करण्यांसाठी आणखी मोठा खर्च करावा लागतो. करिता जिवन जगण्यासाठी जे खाण्याची गरज आहे तेच पदार्थ खाल्ले पाहिजे. व्यसनाच्या आहारी गेलेली व्यक्ती खेळात प्रविण्य प्राप्त करु शकत नाही. तसेच युवकांनी आवडीच्या खेळ प्रकारात भाग घ्यावा जेणेकरुन त्यांच्यात खेळाडू वृती जागृत होईल ज्याचा उपयोग आपसी सलोखा टिकऊन ठेवण्यात होईल. त्यांनी आपली शक्ती विनाकारण भांडण तंट्यात व मारामारी करण्यांत न घालवता अन्याय व अत्याचाराविरोधात संघर्ष करण्यांत खर्ची घलावी असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले.
यावेळी मंचावर विराजमान उदघाटकीय सोहळ्याचे उदघाटक महिला कॅांग्रेस प्रदेश सचिव डॅा. चंदाताई कोडवते, सह उदघाटक चामोर्शी तालुका कॅांग्रेस अध्यक्ष प्रमोद भगत, डॅा. रायसिडाम, माजी पं. स. सदस्य धर्मशीला ताई सहारे, राकेशभाऊ धोटे, सरपंच पार्वताबाई कन्नाके, उपसरपंच रेवतीताई पोरटे, ग्रा. प. सदस्य सुनिल भाऊ कन्नाके, प्रमोद सहारे व गणमान्य मंडळी तसेच मोठ्या संख्येने उपस्थीत जनसमुदाय.
0 Comments