'त्या' भ्रष्ट अधिकाऱ्याचे निलंबन नाही तर त्याला सेवेतूनच बडतर्फ करा: सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार

'त्या' भ्रष्ट अधिकाऱ्याचे निलंबन नाही तर त्याला सेवेतूनच बडतर्फ करा: सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार

जिल्ह्यात पुन्हा काही भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांची लवकरच पोलखोल करणार

 लवकरच बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराचे काळे कारणामे जनतेपुढे आणणार


गडचिरोली,
नागपूरमधील मनीषनगरात एका मद्यालयात 'महाराष्ट्र शासन' असे लिहिलेल्या 'फाइल्स'वर स्वाक्षऱ्या केल्याचे प्रकरण उजेडात आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. हे अधिकारी गडचिरोलीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चामोर्शी उपविभागातील उपविभागीय अभियंता देवानंद सोनटक्के असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांचे मंगळवारी तडकाफडकी निलंबन करण्यात आले. परंतु अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांचे फक्त निलंबन करून चालणार नाही तर यांना सेवेतूनच बडतर्फ करावे अशी मागणी जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण महाराष्ट्र गडचिरोली जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी केले आहे. विशेष म्हणजे या भ्रष्ट अधिकाऱ्याने जिल्ह्यात जिथे जिथे कामे केले आहे ते त्या संपूर्ण कामाची चौकशी होणे गरजेचे आहे. सदर अधिकाऱ्याने जिल्ह्यात कामे करताना मोठा भ्रष्टाचार केला असून करोडोची माया जमवली आहे अशी सुद्धा चर्चा आहे.सदर सोनटक्के डेप्युटी इंजिनियर यांनी आपल्या कार्यकाळात आपल्या पदाचा दुरुपयोग करत आपल्या जवळच्या नातेवाईक च्या नावे देयके उचलले आहेत अशी ही चर्चा आहे. अशा भ्रष्ट अधिकार्‍याचे कारणामे बांधकाम विभागाच्या लक्षात कसे आले नाही?हा सुद्धा मोठा प्रश्नचिन्ह आहे? त्यामुळे येत्या काळात या बांधकाम विभागाच्या भ्रष्टाचाराच्या  विरोधातच मोठा आंदोलन उभारला जाईल अशी सुद्धा माहिती संतोष ताटीकोंडावार यांनी दिली आहे.अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात विकास कामांना  अडथळा आणला असून अनेक अधिकारी भ्रष्ट कामातून निकृष्ट दर्जाचे काम करून शासनाला लुबाडत असतात. एखाद्यानी जर आवाज उठवला तर त्याच्यावर ब्लॅकमेलिंग चा सर्रास आरोप करत असतात. बांधकाम विभागात तसेच इतरही विभागात जिल्ह्यात पुन्हा काही भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांची लवकरच आपण पोलखोल करणार असून अशा भ्रष्ट लोकांना निलंबन करून चालणार नाही तर त्यांना सेवेतूनच बडतर्फ करावे अशी मागणी संतोष ताटीकोंडावार यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments