अहेरी तालुक्यात मुसळधार पावसाने कहर; लक्ष्मण व व्यंकटराव पेटा नाल्यांना पूर ; माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांची पाहणी

अहेरी तालुक्यात मुसळधार पावसाने कहर; लक्ष्मण व व्यंकटराव पेटा नाल्यांना पूर ; माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांची पाहणी


अहेरी : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.विशेषतः लक्ष्मण नाला आणि व्यंकटरावपेठा नाल्यांना आलेल्या पुरामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून,काही मार्गांवरील वाहतूकही खंडित झाली आहे.

या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसनेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी आज पूरग्रस्त भागांना भेट दिली.त्यांनी स्थानिक प्रशासन व ग्रामस्थांशी संवाद साधून परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू करावे,अशा सूचना दिल्या.पुरामुळे काही भागात शेतीचे नुकसान झाल्याचीही प्राथमिक माहिती समोर आली असून,स्थानिक शेतकरी चिंतेत आहेत.दरम्यान,आपत्ती व्यवस्थापन पथक सतर्क असून,प्रशासनाकडून सतत परिस्थितीवर नजर ठेवण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments