लॉयड्स’च्या एकात्मिक ग्रीन स्टील प्रकल्पाचे उद्घाटन व भूमिपूजन २२ जुलै रोजी

लॉयड्स’च्या एकात्मिक ग्रीन स्टील प्रकल्पाचे उद्घाटन व भूमिपूजन २२ जुलै रोजी

मान.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते कोनसरी येथे कार्यक्रमाचे आयोजन;
मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांनी कार्यक्रम स्थळाची पाहणी केली.


गडचिरोली,  
गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल उचलले जात असून चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे ‘लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड’च्या एकात्मिक ग्रीन स्टील निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन व विविध प्रकल्पांचे भूमिपूजन मंगळवार, दिनांक २२ जुलै २०२५ रोजी संपन्न होणार आहे.
हा भव्य कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मान. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार असून, जिल्ह्याच्या औद्योगिक वाटचालीतील हा एक ऐतिहासिक क्षण ठरणार आहे.
या पार्श्वभूमीवर माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी कोनसरी येथील कार्यक्रम स्थळाला भेट देऊन संपूर्ण व्यवस्थेची बारकाईने पाहणी केली. नियोजन, सुरक्षा, वाहतूक आणि स्वागत यंत्रणा यांचा आढावा घेत संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना व मार्गदर्शन केले.
या दौऱ्यात भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे, प्रकल्प व्यवस्थापक व्यंकटेशजी, तसेच गोलूभाऊ सोमनानी उपस्थित होते.
कोनसरी प्रकल्पामुळे स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून या प्रकल्पामुळे परिसराचा सामाजिक आणि आर्थिक विकास अधिक गतिमान होईल.
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या वतीने आयोजित या ऐतिहासिक कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असून, २२ जुलै हा दिवस गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाणार आहे.

Post a Comment

0 Comments