गोसी खुर्द धरणातून पाण्याच्या विसर्गाने वैनगंगा नदीला महापुराचा फटका; मा. खा. डॉ. अशोकजी नेते यांची प्रत्यक्ष पूरग्रस्त गावांना भेट,जनतेला दिलासा व प्रशासनाला आवश्यक निर्देश
गडचिरोली
गोसी खुर्द धरणातून तब्बल १३,००० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने वैनगंगा नदीची पातळी झपाट्याने वाढली असून नदीकाठच्या गावांना महापुराचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी, आरमोरी-नागपूर व चामोर्शी रस्ते व इतरही रस्ते बंद, तर अनेक गावांचा संपर्क पूर्णतः तुटलेला आहे.
या पार्श्वभूमीवर माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी गडचिरोलीत वैनगंगा नदीच्या पुलावरील पाण्याचा विसर्ग पाहत सावली तालुक्यातील पुरग्रस्त भागांची पाहणी केली. त्यांनी दौरा करत, कवठी पारडी, जिबगांव, उसेगांव व हरणघाट येथे जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला.
नुकसानीची माहिती घेत या दौर्यात मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून शेती पिकांचे नुकसान, घरांची पडझड अवशेषांचे नुकसान, जनावरांचे हाल व अन्नधान्याचा तुटवडा याबाबत सविस्तर माहिती घेतली.
“या पुरामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनदरबारी मांडून तातडीची मदत मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल,” असा विश्वास त्यांनी नागरिकांना दिला.
नागरिकांसाठी सतर्कतेच्या सूचना -मा.खा.डॉ. अशोकजी नेते
नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी त्वरित सावधगिरी बाळगावी,जनावरे, धान्य व शेती साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे,अनावश्यक हालचाली व नदीकाठच्या भागात जाणे टाळावे,स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे,,व नागरिकांनी सतर्कता बाळगावी अशा ही सूचना त्यांनी दिल्या.
सावली येथे डॉ. अशोकजी नेते यांनी आले असता स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा करत कवठी पारडी व हरणघाट रस्त्यांची दयनीय अवस्था, धानपिकाचे नुकसान, गावांतील पायाभूत सुविधांचा अभाव, संपर्कयंत्रणांची अडचण यावर गंभीर चर्चा करण्यात आली.
“समन्वयातून उपाययोजना करणे हाच एकमेव मार्ग आहे,” असा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी पुरपरिस्थिती बाबत पाहणी करतांना सोबत मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणयजी खुणे,जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे,जिल्हा उपाध्यक्ष अविनाश भाऊ पाल,जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी,भाजपा तालुकाध्यक्ष किशोर वाकुडकर,पं.स.माजी सभापती छायाताई शेंडे, भाजपाचे युवा नेते राकेश गोलेपल्लीवार, सुरज किनेकर, दिपक शेंडे, जितेश सोनटक्के, विनोद धोटे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
0 Comments