तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांनी दिलेला शब्द पाळला

तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांनी दिलेला शब्द पाळला


गडचिरोली,
विनानुदानित शाळा कृति समितीच्या धरणे आंदोलनाला दिनांक 31 जुलै रोजी तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांनी भेट दिली होती आणि त्यावेळी असे आश्वासन दिले होते की राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री मा.ना.राजे धर्मरावबाबा आत्राम यांचा 2 अगस्त रोजी दौरा असून आपन त्यांच्या ही बाब लक्ष्यात आणून देणार असून ती राज्याचे उपमुख्यमंत्री मा अजितदादा पवार यांच्याकडे पुढील मागण्या मान्य करण्यासाठी बोलणार असल्याचे आश्वासन दिले होते.
त्यानुसार आज सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांनी सदर आंदोलन करीत असलेल्या शिक्षक यांच्यासोबत भेट घडवून दिले.आणि लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यासोबत बोलून आपण सदर आंदोलन करते शिक्षक यांच्या मागण्यांवर तोडगा काढणार असल्याचे आश्वासन राज्याचे अण्णा औषध व प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दिले
दिलेला शब्द तनुश्रीताई आत्राम यांनी पाळल्याचे समाधान आंदोलन करते शिक्षक यांच्या चेहऱ्यावर दिसत होते

Post a Comment

0 Comments