आंधळी येथे धान पीकावर प्रक्रिया उद्योग (राईस मिल) ची उभारणी प्रक्रिया उद्योगाचे उद्घाटन - सहकार महर्षि अरविंदजी सावकार पोरेड्डीवार यांच्या हस्ते

आंधळी येथे धान पीकावर प्रक्रिया उद्योग (राईस मिल) ची उभारणी  प्रक्रिया उद्योगाचे उद्घाटन  - सहकार महर्षि अरविंदजी सावकार पोरेड्डीवार यांच्या हस्ते  






गडचिरोली,
तालूक्यातील आंधळी येथे शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ नाशीक यांचा वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था आंधळी येथे धान पीकावर प्रक्रिया उद्योग (राईस मिल) ची उभारणी करण्यात या प्रक्रिया उद्योगाचे उद्घाटन आज दिनांक १६ जुन २०२४ रविवार रोजी सहकार महर्षि अरविंदजी सावकार पोरेड्डीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक सहकार महर्षि अरविंद सावकार पोरेड्डीवार, कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी आमदार कृष्णा गजबे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा सहकारी बैंकेचे संचालक खेमनाथ पाटील डोंगरवार कृषी उत्पन्न बाजार समीतीचे संचालक चांगदेव फाये,सहकार बोर्डाचे अध्यक्ष वसंतराव मेश्राम,आविका संस्थेचे सभापति केशव कीरसान सरपंच दिनकर कूमरे सरपंच उज्वला रायसिडाम महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक एम एस बावणे, लोमेश उसेंडी, नगरसेवक अॅड उमेश वालदे,खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष व्यंकटी नागीलवार,भात गिरणीचे अध्यक्ष बब्बू मस्तान, यशवंत चौरीकर, उध्दव गहाणे उपसरपंच अप्रव भैसारे सूधाकर वैरागडे,मोनेश मेश्राम आदि उपस्थित होते.

महामंडळाचा वतीने नाविण्यपूर्ण उपक्रमा अंतर्गत जिल्हात प्रथमच आविका संस्था मार्फत धानावर प्रक्रिया उद्योगाची उभारणी करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments