ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित साखळी उपोषणास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटाचा जाहीर पाठिंबा.
गडचिरोली,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट गडचिरोली जिल्हा च्या वतीने जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार , प्रदेश सचिव एडवोकेट संजय ठाकरे, शहराध्यक्ष विजय गोरडवार, जिल्हा सरचिटणीस प्रदीप चुधरी, जिल्हा उपाध्यक्ष नहीम शेख, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष शेमदेव चापले, उपाध्यक्ष चंद्रकांत शिवणकर, सुजित राऊत,छत्रपती टेंबरे, तुलाराम मायकलवार ,सुधाकर गद्दे, रमेश भुसारकर ,माधव परसोडे, पंकज बारसागडे खुशाल ठाकरे आदींनी भेट देऊन ओबीसींच्या सर्व मागण्या आमच्या पक्षांच्या मागण्या आहेत आम्ही पक्षाच्या वतीने ओबीसी मागण्यासाठी पूर्णपणे सहकार्य करण्यास खंबीर आहोत. पक्षाच्या वतीने हा अन्याय दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू असे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांनी याप्रसंगी सांगितले.
गोंदिया जिल्हा स्वातंत्र्यसंग्राम सैनिक उत्तराधिकारी संघटना गोंदिया जिल्ह्याचा साखळी उपोषणास पाठिंबा
संघटनेचे अध्यक्ष रमेश उरकूडाजी मेश्राम , सदस्य आदेश नागुलवार यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन साखळी उपोषणास जाहीर पाठिंबा व्यक्त केला. ओबीसी समाज संघटनेच्या वतीने साखळी उपोषनाच्या माध्यमातून शासनाकडे केलेल्या मागण्या ह्या संविधानिक असून, त्या रास्त आहेत,जनतेच्या हिताच्या आहेत.पण राज्य शासन व केंद्र शासन यांच्याकडे दुर्लक्ष करून युवक वर्गाचे वाटोळे करत आहे व ओबीसी बांधवांवर अन्याय होत आहे. तरी या निवेदनाच्या माध्यमातून शासनास विनंती करतो की,ओबीसी समाजावर झालेला अन्याय तात्काळ दूर करावा.
अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष जिल्हा गडचिरोलीचा साखळी उपोषणास जाहीर पाठिंबा.
अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष जिल्हा गडचिरोलीच्या वतीने जिल्हाध्यक्ष हंसराज उंदीरवाडे ,केशव सामृतवार प्रदेश सचिव, अशोक खोब्रागडे कार्यालयीन सचिव यांनी इंदिरा गांधी चौकात आयोजित साखळी उपोषणास जाहीर पाठिंबा पत्र देऊन दिला आहे. लग्नाचे शिल्पकार म्हटले आहे ओबीसी समाज संघटनेच्या वतीने शासनाकडे केलेल्या मागण्या राष्ट्र व संविधानिक असून समाज हिताचे आहेत त्याची शासनाने त्वरित पूर्तता करावी अशी मागणी त्यांनी शासनाला या पत्राद्वारे केली आहे यावेळी केशव सामृतवार यांनी उपोषणास बसलेल्या युवकांना मार्गदर्शन केले.
कुणबी समाज सेवा समितीच्या वतीने साखळी उपोषणास जाहीर पाठिंबा.
ओबीसींच्या संविधानिक मागण्या बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे, ओबीसीच्या मागण्यावर प्रत्येक विरोधी पक्ष सकारात्मकता दाखवीत असतो परंतु सत्तेत आल्यावर तेच पक्ष दिलेले शब्द पाळत नाही, शासनाकडून होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून ओबीसी युवकांनी हे साखळी उपोषण विविध संविधानिक मागण्याकरिता चालू केलं आहे त्याला कुणबी समाजसेवा समिती गडचिरोलीच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहे ओबीसी युवकांच्या मागे कुणबी सेवा समिती ठामपणे उभी आहे. पाठिंबा देताना कुणबी सेवा समितीचे अध्यक्ष एड. संजय ठाकरे , टीकाराम भोयर, जितेंद्र मुनघाटे, योगेंद्र झंजाळ, उत्तम ठाकरे, शेषराव येलेकर, सेवानिवृत्त पीएसआय पुरुषोत्तम ठाकरे,किरण कारेकर ,महेंद्र ब्रम्हणवाडे, रमेश चौधरी,सतीश विधाते, माकडे सह समाज बंधाव उपस्थित होते.
0 Comments