प्रदेश चिटणीस अलका आत्राम, रेखा डोळस यांच्या उपस्थितीत बैठक
गडचिरोली : मोदी @ 9 महाजनसंपर्क अभियानांतर्गत गडचिरोली जिल्हा भाजप महिला आघाडीची महत्वाची बैठक विश्राम गृह गडचिरोली येथे घेण्यात आली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षाच्या कार्यकाळातील कामे जनतेपर्यंत पोहोचविण्याकरीता भाजपा महिला आघाडीने पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना केले.
अर्थव्यवस्थेमध्ये आपला भारत देश अकराव्या स्थानी होता. आता तो पाचव्या स्थानी आहे. देश सध्या प्रगतीपथावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या देशाला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी प्रयत्न आहे. नववर्षांमध्ये त्यांनी संपूर्ण देशात अनेक लोकाभिमुख योजना अंमलात आणुन तळागाळापर्यंतच्या लोकांपर्यंत त्या पोहोचविल्याचे खासदार नेते म्हणाले.
यावेळी प्रामुख्याने आमदार डॉ.देवराव होळी, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, प्रदेश सदस्य तथा चंद्रपूर महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अल्का आत्राम, प्रदेश चिटणीस रेखा डोळस, माजी.जि.प.सदस्य तथा माजी समाजकल्याण सभापती रणजिता कोडापे, शिल्पा रॉय उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन धानोरा तालुकाध्यक्ष लता पुंघाटी, भाजपा ओबीसी महिला आघाडीच्या नेत्या डॉ. संगीता राऊत, पुष्पा करकाडे, अहेरी विधानसभा नेत्या रहिमा सिद्दीकी व पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच खासदार नेते यांचे सोशल मिडिया प्रमुख दिवाकर गेडाम, मिडिया प्रमुख रमेश अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments