व्याघ्रबळी ठरलेल्या मातेच्या पाल्यांना मिळाले जगण्याचे बळ.
दोन भावंडाच्या शिक्षणाची उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी स्विकारली जबाबदारी.
गडचिरोली,
गडचिरोली तालुक्यातील मौशिखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील अमिर्झा टोली येथील खाटे कुटुंबाचे दायित्व स्विकारून स्वातंत्रवीर वि.दा. सावरकरांना आदरांजली..!
निराधार गरजवंताला आधार देऊन त्याचे दायित्व स्विकारणे व त्यांच्या जीवनाला नवी दिशा देऊन जगण्याची बळ देणे यासारखे पुण्यकार्य दुसरे कोणतेही नाही. संकटाच्या वेळी गरजवंतांच्या मदतीला धावून जाणे, हा खरा मानवधर्म आहे. उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी मानवधर्माच्या शिकवणीचा प्रत्यय आणून देत, स्वातंत्रवीर वि.दा. सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब - मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील अमिर्झा टोली येथील व्याघ्रबळी ठरलेल्या महिलेच्या दोन मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्विकारून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.
गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब- मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रात येणाऱ्या अमिर्झा टोली येथील अल्पभुधारक महिला शेतकरी मंदा संतोष खाटे या आपल्या शेतशिवारात कामासाठी गेल्या असता वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली. कुटुंबाची स्थिती हलाखीची असून त्यांच्या पश्चात पती संतोश खाटे आणि आदीनाथ व दुर्गेश नावाची छोटी मुले आहेत. खाटे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. आपली मुले दुर्गेश व आदिनाथने चांगले शिक्षण घेऊन यशोशिखर गाठावे अशी इच्छा मंदा खाटे यांची होती. त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी कोणतेही कसर सोडली नाही. परंतू व्याघ्रबळीच्या रूपात काळाने त्यांना हिरावून नेले.
गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब- मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील अमिर्झा टोली येथील व्याघ्रबळी ठरलेल्या खाटे कुटुंबाची व्यथा कळताच अरविंदभाऊ कात्रटवार यांनी कुटुंबाची भेट घेऊन मातृछायेपासून पोरके झालेल्या छोट्या भावंडाना आधार देण्याचे ठरविले. स्वातंत्रविर वि. दा. सावरकर जयंतीचे औचित्य साधून दोन्ही भावंडांच्या शिक्षणाची जबाबदारी स्विकारून मानवतेचे दर्शन घडविले. तसेच कुटुंबाला आवश्यक व जीवनावश्यक साहित्य दिले. अरविंदभाऊ कात्रटवार यांनी स्विकारलेल्या जबाबदारीचे अमिर्झा टोली येथील नागरिकांनी कौतूक केले.
याप्रसंगी उपतालुका प्रमुख यादवजी लोहंबरे, संजय बोबाटे, विभाग प्रमुख अमित बानबले, उपविभाग प्रमुख संदिप आलबनकर, विभाग प्रमुख प्रशांत ठाकुर, रमाकांत चिंचोलकर, सचिन मडावी, जगन चापले, सुरज उईके, अंबादास मुनघाटे, दिलीप वलादे, अनिल कोसमशिले, रत्नाकर रंधये, त्र्यंबक फुलझेले, गणेश गेडाम, राहुल सोरते, प्रविण निसार, छगन चापडे, रमेश चौधरी, मोहन सोरते, हिवराज वाकडे, रविंद्र सावसाकडे, प्रेमदास जांभुळकर, बालाजी बाबनवाडे, रविंद्र चुधरी, अनिल दोडके, प्रकाश नागापूरे, निलकंठ रणदिवे, बापू भादे, पांडूरंग धानफोले, सुरेश मसराम, मंगेश कामडी, सुधाकर सावसागडे आदि शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
0 Comments