गडचिरोली जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांची नियुक्ती

गडचिरोली जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांची नियुक्ती


गडचिरोली : 
  
    गडचिरोली जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.
    जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड केल्याबद्दल जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. श्री देवेंद्रजी फडणवीस, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे.
  
    त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून खासदार अशोकजी नेते, भाजपचे जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, आम डॉ देवरावजी होळी, आम कृष्णाजी गजबे, माजी राज्यमंत्री राजे अंबरीशराव आत्राम, भाजपचे प्रदेश सदस्य बाबुरावजी कोहळे, सहकार महर्षी प्रकाश सावकार पोरेड्डीवार, जिल्हा संघटन महामंत्री रवींद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रशांतजी वाघरे, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, किसान मोर्चा चे प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे, जिल्हा संपर्क प्रमुख सदानंद कुथे तसेच भाजपा पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments