आमदार गजबेंच्या अध्यक्षतेखाली जिल्हयातील सहकारी खरेदी विक्री संस्थांची बैठक सपन्न

आमदार गजबेंच्या अध्यक्षतेखाली जिल्हयातील सहकारी खरेदी विक्री संस्थांची बैठक सपन्न


देसाईगंज:
    आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या देसाईगंज येथील जनसंपर्क कार्यालयात आमदार गजबे यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली जिल्ह्यातील धान ख़रेदी संघ सहकारी संस्थांची बैठक पार पाडण्यात आली. 
    सदर बैठकित जिल्हयातील धान ख़रेदी करणाऱ्या संस्थांच्या समस्या मांडण्यात आल्या.यात संस्थांचे कमीशन, हमाली व गोदाम भाडे,रब्बी धान खरेदी संबंधाने विविध विषयावर चर्चा करण्यात आली.शासनाच्या चुकिच्या परिपत्रकामुळे जिल्हयातील धान खरेदी बंद होती.सदर शासन निर्णय परीपत्रकात दुरुस्ती करण्यासबंधाने वरिष्ठ स्तरावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस,अन्न व नागरी पूरवठा मंत्री,व्यवस्थापकीय संचालक फेडरेशन, व्यवस्थापकीय संचालक आदिवासी विकास महामंडळ,  प्रधान सचिव अन्न व नागरी पूरवठा विभाग,गडचिरोली  ज़िल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येवून पाठपुरावा करण्यात येईल व समस्या सोडविण्यात येतील असे अश्वासन आमदार गजबे यांनी उपस्थित शिष्टमंडळाला दिले. 
     जिल्हयातील रब्बी धान खरेदी करण्यासाठी ऑनलाइन प्रकिया सुरवात करण्यात येत आहे. 
तसेच जिल्हयातील धान ख़रेदीबाबतच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार कृष्णा गजबे यांनी बाजारसमितिचे सभापती अतुलभाऊ गण्यारपवार यांना  मंत्री व व्यवस्थापकीय संचालक यांची दिनांक १६ मे २०२३ रोज भेट घेणार असल्याचे सांगीतले.सदर बैठकीला चामोर्शी संस्थेचे अध्यक्ष अतुलभाऊ गण्यारपवार, आरमोरी संस्थेचे अध्यक्ष मनोज मने,कूरखेड़ा संस्थेचे अध्यक्ष व्यंकटी नागिलवार,माजी सभापती खिळसागर नाकाडे,देसाईगंज खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष अण्णाजी तुपट,खेमराज डोंगरवार,तलमले आदी पदाधिकारी,संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments