आता अंगठ्यावर शाईऐवजी ग्रामस्थ करणार स्वाक्षरी

आता अंगठ्यावर शाईऐवजी ग्रामस्थ करणार स्वाक्षरी

अभिनव अभियान; पुण्याची त्रिशरण फाउंडेशन, लॉईड्स मेटलचा संयुक्त उपक्रम

एटापल्ली ,
 स्वातंत्र्याची साडेसात दशके उलटली, तरी गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम, अतिदुर्गम भागांतील अनेक नागरिक निरक्षर असून कोण्याची कागदपत्रांवर त्यांच्या स्वाक्षरीऐवजी अंगठ्याला शाई लावून त्याचा छाप घेतला जातो. पण आता ही परीस्थिती बदलणार असून अंगठ्याला लागलेली शाई पुसून हे ग्रामस्थ आता शाईचा पेन हातात घेऊन थाटात वळणदार स्वाक्षरी करणार आहे. त्यासाठी पुण्याची त्रिशरण फाउंडेशन, लॉईड्स मेटलच्या संयुक्त विद्यमाने 'मी स्वाक्षरी करणार....!' हे अभिनव अभियान सुरू करण्यात आले आहे.

गावागावांतील महिला व पुरुषांना अंगठा वापरण्याऐवजी स्वाक्षरी करता यावी म्हणून आउटरिच सेंटर अंतर्गत पेठा या गावात 'मी स्वाक्षरी करणार..! अभियान पंधरवडा कार्यक्रम राबविण्यास सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी शुभम गुप्ता यांनी केले. यावेळी त्रिशरण फाउंडेशनच्या संचालिका प्रज्ञा वाघमारे, त्रिवेणी लॉईड्स मेटल कंपनीचे महाव्यवस्थापक साई कुमार, त्रिशरण

फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक मंगल मशाखेत्री, सरपंच वनिता कोरामी, गाव पाटील दस्सा कोरामी यांची प्रमुख उपस्थिती होती. उपविभागीय अधिकारी गुप्ता म्हणाले की, हा उपक्रम माझ्या स्वप्नात होता आणि त्रिशरण फाउंडेशनच्या संचालिका वाघमारे यांनी हे स्वप्न सत्यात उतरविण्यास सुरुवात केली आहे. या अभियानात ग्रामस्थ सहभागी होऊन स्वाक्षरी करणारही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे,
एटापल्ली साहित्य वाटप करताना उपविभागीय अधिकारी गुप्ता.
असेही ते म्हणाले. संस्थेच्या संचालिका प्रज्ञा वाघमारे म्हणाल्या की, आपल्या निरक्षरतेचा फायदा घेऊन अनेकजण फसवणूक करतात. त्यामुळे स्वाक्षरतेवर भर द्यायला हवा. कार्यक्रमात नोट पॅड, पेन व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम राज्य प्रकल्प व्यवस्थापक प्रशांत वाघमारे व जिल्हा
समन्वयक मंगल मशाखेत्री यांच्या नेतृत्वात पार पडला. कार्यक्रमासाठी मंगेश दुर्वा, विनोद पदा, शेवंता नरोटी, वनिता पुंगाटी, हेडरी व पेठामधील आउट रिच सेंटरचे विकास दुत निशा शुक्ला, अमिषा पुंगाटी, शुभम कोरसामी, अमित लेखामी यांनी सहकार्य केले.

व्यक्त केला आनंद

या अभिनव उपक्रमाबाबत गावातील महिलांनी आनंद व्यक्त केला. आम्हाला या उपक्रमाबाबत खूप उत्सुकता वाटत आहे, असे प्रशिक्षणार्थी अशिक्षित महिलांनी आपल्या मनोगतातून सांगितले.

Post a Comment

0 Comments