गडचिरोली जिल्हा धोबी ,परीट वरठी समाज सेवा संघटनेची बैठक संपन्न
गडचिरोली शहरातील गणेश कॉलनी येथील श्री गणेश मंदीर येथे श्री.विजय गोरडवार माजी सभापती न. प. गडचिरोली. यांचे अध्यक्षतेखाली व श्री संतोष आकणुरवार जिल्हाध्यक्ष धोबी समाज संघटना जिल्हा गडचिरोली, सचिव श्री मोरेश्वर मानपल्लीवार, यांचे प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी असंख्य समाज बांधव तथा भगिनी उपस्थित होत्या. समाजातील अंतर्गत अनेक विषयावर चर्चा करण्यात आली. तसेच दरवर्षी प्रमाणे यंदाही समाज संघटनेच्या वतीने श्री संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्याचे संबंधाने ठरविण्यात आले असून, सदर कार्यक्रम हा विविध उपक्रम राबवून साजरा करण्या करता "श्रीसंत गाडगेबाबा जयंती उत्सव समिती" स्थापन करण्यात आली. या समितीमध्ये अध्यक्षपदी श्री रमेश विठोबाची गडपायले (सेवा निवृत्त शिक्षक) यांची निवडकरण्यात आली असून, उपाध्यक्ष- श्री विलास गजानन केळझरवार, सचिव- अरविंद गंगाधर मादेश्र्वार, कोषाध्यक्ष- श्रीमती लताताई वरघंटे, सहसचिव- महेश प्रभाकर कोतकोंडावार,
सहकोषाध्यक्ष- श्री भास्कर बालाजी केळझरकर, तर सदस्य म्हणून श्री क्रिष्णा लटारुजी रोहनकर, श्री रविभाऊ राजेश्वर यमलकुर्तीवार , श्री अमोल पुरुषोत्तम येम्पल्लिवार. श्री विनोद आत्माराम गोरडवार, सौकल्पना रमेशराव चतुरकर, पण. स्नेहा अमोल रोहनकर, सौ. माधुरी अभिषेक कोतकोंडावार, सौ. सुनंदाबाई रुमाजी गोरडवार, आदींची निवड करण्यात आली असून, यांचे माध्यमातून श्री संत गाडगे बाबा यांच्या जयंती निमित्त लहान मुला मुलींचे व महीलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, रांगोळी स्पर्धा, हळदी कुंकू कार्यक्रम, मान्यवरांचे प्रबोधन,भजन, कीर्तन, शोभायात्रा, महाप्रसाद अशा प्रकारे विविध कार्यक्रम राबवून साजरी करण्याचे एकमताने ठरविण्यात आले. यावेळी प्रभाकर राहुलवार, गजानन कुद्रकवार,माणिक केळझरकर, विकास तरमनवार, संतोष भस्मावार, मंगल लोणारे, किशोर केळझरकर, सौ मंगला केळझरकर, तृप्ती गोरडवार,अर्चना चूनारकर
सौ कोतकोंडावार आधी समाज बांधाव तथा भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments