शेतकऱ्यांचे धान्य चुकारे लवकरच मिळणार - माजी आमदार कृष्णाजी गजबे यांची आविमच्या वरिष्ठ अधिकारी कडे पाठपुरावा

शेतकऱ्यांचे धान्य चुकारे लवकरच मिळणार -
माजी आमदार कृष्णाजी गजबे यांची आविमच्या वरिष्ठ अधिकारी कडे पाठपुरावा


कुरखेडा,
आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मार्फत शेतकरी बांधवाकडून रब्बी हंगामात विक्री करण्यात आलेल्या धान्य विक्रीचे पैसे दोन महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात न आल्याने शेतकरी वर्ग कमालीचा नाराज होवून आर्थिक संकटात सापडले असल्याने यासंदर्भात अनेक शेतकऱ्यांनी माजी आमदार कृष्णाजी गजबे यांच्याकडे समस्या सांगितली.
 यासंदर्भात माजी आमदार कृष्णाजी गजबे यांनी  आदिवासी विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक गाडे व प्रादेशिक व्यवस्थापक सांबारे यांच्या सोबत चर्चा करून वारंवार पाठपुरावा केल्याने संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर या संदर्भातील शेतकऱ्यांचे चुकारे प्राप्त होणार असल्याची माहिती माजी आमदार कृष्णाजी गजबे यांना दिली आहे. 
           आज कुरखेडा तहसील कार्यालयात आमदार कृष्णा गजबे यांनी शेतकऱ्याचे समस्याचे दखल घेण्याकरिता कुरखेडा तहसील कार्यालयात आले असता त्यांनी आदिवासी विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक गाडे मॅडम व गडचिरोली प्रादेशिक व्यवस्थापक सांबारे   यांच्यासोबत भ्रमणध्वनीद्वारे  चर्चा केली. व त्यांनी शेतकऱ्याचे लवकरात लवकर चुकारे जमा करण्यासंदर्भात प्रशासन स्तरावरून प्रयत्न करणार असल्याचे  माहिती त्यांनी माजी आमदार गजबे यांना दिली.  
       यावेळी चर्चेदरम्यान  दरम्यान  भारतीय जनता पार्टी, तालुकाध्यक्ष माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये कुरखेडा तहसील कार्यालयाचे तहसीलदार धनबाते नायब तहसीलदार अदमवार व अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. 
         शेतकऱ्यांनी रोवणी केलेल्या मजुरांचे पैसे व खत व ट्रॅक्टर चे पैसे कुठून द्यायचे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून शेतकऱ्यांच्या शेतकामावर आलेल्या  मजूर व ट्रॅक्टर मालक हे कामाचे पैसे मागण्याकरिता आटापिटा करीत असल्याचे दिसून येत असल्याने शेतकरी मात्र रब्बी हंगामात धान्य विक्री केल्याचे पैसे जमा व्हायची आतुरतेने वाट बघत होता.
 चुकारे जमा न झाल्याने  सदर शेतकरी   आर्थिक समस्याचा सामना सुद्धा कुरखेडा तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करावे लागत आहे.
   रब्बी हंगामात धान्य विक्रीचे पैसे केव्हा जमा होतील याकडे लक्ष देऊन तो दररोज बँक चकरा मारत असल्याचे दिसून येत होते परंतु शेतकऱ्याना बँकेमधून सुद्धा खाली हात यावे लागत असल्याने कुरखेडा तालुक्यातील जिल्ह्यातील शेतकरी बांधव अस्मानी व सुलतानी संकटात सापडला असल्याचे चित्र निर्माण झाले होते .त्यामुळे संबंधित विभागाने  सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांच्या  खात्यात तात्काळ धान्य विक्रीचे पैसे जमा करावेत अशी  मागणी कुरखेडा तालुक्यातील  शेतकरी बांधवांनी आमदार कृष्णाजी गजबे यांच्याकडे केली जात होती या मागणी दखल आमदार कृष्णाची गजबे यांनी घेतली.
 व त्यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केल्याने शेतकऱ्यांचे चुकारे होणार असल्याची माहिती  संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याकडून  देण्यात आली आहे 
तसेच वनपट्टेधारक शेतकरी व इतरही शेतकरी  बोनस पासून वंचित असून  
वनपट्टटे धारकांनी खरीप हंगामात धान्य विक्री केले असून  हे शेतकरी बांधव सुद्धा बोनस पासून वंचित राहिल्याने त्यांना सुद्धा तात्काळ बोनस देण्यात यावे  या संदर्भातही माजी आमदार कृष्णाजी गजबे यांनी वरिष्ठ अधिकार सोबत चर्चा केली. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रलंबित समस्या लवकरच निकाली लागतील.

Post a Comment

0 Comments