शहरी 'आयुष्मान आरोग्य मंदिर' चे देसाईगंज येथे उद्घाटन; माजी आमदार कृष्णा गजबे यांची प्रमुख उपस्थिती
देसाईगंज (वडसा):
देसाईगंज शहरातील हनुमान वार्ड येथे 'सार्वजनिक आरोग्य अभियान' अंतर्गत शहरी ‘आयुष्मान आरोग्य मंदिर’ चे उद्घाटन नुकतेच पार पडले. या कार्यक्रमाला आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांची प्रमुख उपस्थिती होती. या आरोग्य मंदिरामुळे शहरातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.*
कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार रामदास मसराम होते. त्यांच्यासोबत तहसीलदार प्रीती डूडूलकर, बीडीओ प्रणाली खोचरे, माजी नगराध्यक्ष शालू दंडवते, नरेश विठ्ठलानी आणि इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
आरोग्यम् परम् धनम्’ या घोषणेनुसार हे आरोग्य मंदिर नागरिकांच्या सेवेसाठी खुले करण्यात आले आहे. यावेळी बोलताना माजी आमदार कृष्णा गजबे म्हणाले की, “प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य हे त्याचे सर्वात मोठे धन आहे. शासन 'आयुष्मान आरोग्य मंदिर' सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. या आरोग्य मंदिराचा लाभ प्रत्येक नागरिकाने घ्यावा.” या नवीन आरोग्य केंद्रात सर्वसामान्य लोकांना कमी खर्चात उपचार मिळणार असल्याने हे केंद्र स्थानिक लोकांसाठी वरदान ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनीही आपले विचार मांडले. देसाईगंज येथील नागरिकांनी या आरोग्य मंदिराचा फायदा घेऊन आपले आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य चांगले राखावे, असे आवाहन त्यांनी केले.
0 Comments