गडचिरोलीत आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
गडचिरोली,
गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांचा वाढदिवस गडचिरोली येथील शासकीय विश्रामगृहात उत्साहात केक कापुन साजरा करण्यात आला.
या निमित्ताने आदिवासी विकास विभागाचे मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. अशोकजी उईके सर तसेच भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी डॉ. नरोटे यांना केक भरवुन पुष्पगुच्छ देऊन मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या निरोगी, यशस्वी व दीर्घायुषी जीवनासाठी शुभ आशीर्वाद दिले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे,गडचिरोली जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेडी
पोलीस अधीक्षक निलोत्पल साहेब,जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे,जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. नितीनजी कोडवते, डॉ. चंदाताई कोडवते तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते, अधिकारी व हितचिंतकांनी आमदार डॉ. नरोटे यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
0 Comments