महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणे राज्यस्तरीय निवडणूकित नागपूर विभागातून प्रमोद पिंपरे विजयी
गडचिरोली,
जिल्हा सहकारी बोर्ड प्रतिनिधी नागपूर विभाग या मतदारसंघातून गडचिरोलीचे भाजपचे जेष्ठ नेते प्रमोद पिपरे यांनी नागपूर विभागात चुरशीच्या निवडणुकीत विजय संपादन केला.मतदान दिनांक. २७/०७/२०२५ ला झाले व निवडणुकीची मतमोजणी व निकाल २९/०७/२०२५ रोज मंगळवारला, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणे यांच्या कार्यालयात पार पडले.
सदर निवडणूकित सहकार पॅनलचे प्रकाश भिशीकर नागपूर व भाजपाचे प्रमोद पिपरे गडचिरोली यामध्ये चुरस रंगली होती, या निवडणुकीत भाजपाचे माझी नगरसेवक प्रमोद पिपरे हे विजयी झाले आहे. सक्षम मतदार जनसंपर्क व पक्षातील नेतृत्व या बळावर त्यांनी निवडणूक लढवली होती.यामध्ये त्यांना विजय संपादन करता आले.जिल्हा सहकार बोर्ड नागपूर विभागात ते प्रथमच निवडणूक मैदानात उतरले होते.सदर निवडणुकीत भाजप पक्षातील जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनात ही निवडणूक सर करण्यात आले. नागपूर विभागात प्रमोद पिपरे पहिल्यांदा निवडणुकीत उमेदवार म्हणून पुढाकार घेतला. त्यांचे प्रतिनिधित्व महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणे या क्षेत्रात पुढील काळात कौशल्याची कामगिरी मिळेल यात शंका बाळगता येत नाही. त्यांच्या विजयासाठी भारतीय जनता पक्षातील ज्येष्ठ नेते यांच्या मार्गदर्शनात सहकार चळवळीचे सक्रिय व तज्ञ इंजि. प्राध्यापक सुभाष आकरे, वर्धा येथील मा.श्री पंकज घोडमारे,मा. श्री नितीन वैरागडे,भाजपा गडचिरोली जिल्हा महामंत्री lसौ. योगिता पिपरे,भाजप गोंदिया जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते यशवंत मानकर,खुमेंद्र कटरे यांनी धुरा सांभाळली होती. त्यांच्या निवडणुकीत विजयाचे खरे शिल्पकार. मा.मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे सहकार नेते मा. आमदार श्री प्रवीण दरेकर मा आमदार श्री परिणय फुके माजी खासदार अशोक नेते, सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार, माजी आमदार डॉ. देवराव होळी,आ. डॉ. मिलिंद नरोटे,भाजप जिल्हा अध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, मा.श्री प्रकाश सावकर पोरेडीवर, भाजप ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, जिल्हा सहकारी iबोर्ड गडचिरोलीचे अध्यक्ष वसंतराव मेश्राम यांचा फार मोटा मोलाचा वाटा असल्याने,प्रमोद पिपरे यांनी त्यांचे आभार मानले व भविष्यात माझ्या राजकीय जीवनात असेच सहकार्य करावेअसे बोलले, निवडणुकीत विजयाबद्दल वरील सर्वांनी अभिनंदन केले आहे.विजय संपादन केल्यानंतर प्रमोद पिपंरे यांनी जिल्ह्यातील अनेक सहकार क्षेत्रातील नेतृत्वकरण्याची संधी यापुढे मिळणार आहे. जिल्हा सहकारी बोर्ड करिता व तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या.पुणे येथील योग्य कार्य संचालनासाठी प्रयत्न राहील असे मत त्यांनी व्यक्त केले.
त्यांनी यावेळी जिल्हा पदाधिकारी व जिल्हा सहकारी बोर्डाचे संचालक मंडळ व निवडणुकीत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणारे पुढारी यांचे त्यांनी आभार मानले आहे.नागपूर विभागात व गडचिरोली जिल्हात प्रमोद पिपरे यांचे चाहते अभिनंदन चा वर्षाव करीत असून, आंनद व्यक्त करीत आहे
0 Comments