गडचिरोली जिल्हा बँकेतर्फे विद्यार्थ्यांकरिता बचतीच्या आधारावर 'स्वप्नसंचय योजना - अध्यक्ष मा.प्रचित आ.पोरेडीवार '

गडचिरोली जिल्हा बँकेतर्फे विद्यार्थ्यांकरिता बचतीच्या आधारावर 'स्वप्नसंचय योजना'



गडचिरोली,
(Deposit Linked Loan Scheme for Students) सुरु करतांना मला खूप आनंद होत आहे. हा एक दूरदर्शी उपक्रम आहे, ज्यामध्ये आमच्या बँकेकडून विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडविण्याचा मानस आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बँकेला संलग्न युवा ग्राहकांची स्वप्ने साकार करण्यासाठी तसेच त्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी ही एक नाविण्यपूर्ण योजना आहे.

युवा ग्राहक आजिवन बँकींग व्यवहाराच्या माध्यमातून बँकेला बँकींग व्यवहारामध्ये स्थिरता आणि वाढ प्रदान करतात. याच उद्देशाने आम्ही विद्यार्थ्यांकरिता बचतीच्या आधारावर 'स्वप्नसंचय योजना' सुरु करीत आहोत. ही योजना युवकांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी आणि त्यांच्या आकांक्षा पूर्णत्वास नेण्यासाठी तयार केलेली असून त्यांना लहान वयापासूनच बचतीची सवय लावून त्यांचा विश्वास आणि निष्ठा सुरक्षित ठेवण्याचे आमचे ध्येय आहे. आम्हाला आशा आहे की, ते बँकेमार्फत सुरु असलेल्या विविध अत्याधुनिक बँकींग सेवांचा वापर करीत राहतील. कारण ते जीवनाच्या विविध टप्प्यातून जातात.

ही योजना विद्यार्थ्यांना कर्जाच्या माध्यमातून फक्त अर्थपुरवठा करण्यासाठी नाही, तर आमच्या युवा पिढीच्या स्वप्नांमध्ये आणि त्यांच्या आशा-आकांक्षामध्ये गुंतवणुक करण्याची ही वचनबद्धता आहे. या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या भविष्यासाठी मजबूत आर्थिक पाया स्थापित करण्याची युवकांना संधी देते. मग ते उच्च शिक्षण घेत असतील किंवा उद्योजकतेच्या जगात पाऊल ठेवत असतील.

तुमची विश्वासार्ह वित्तीय संस्था म्हणून GDCC बँकेची निवड केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि आम्ही सुद्धा तुमच्या आर्थिक विकासातील प्रवासात एक भाग बनून तुमची स्वप्ने प्रत्यक्षात साकार करण्यासाठी उत्सुक आहोत.

Post a Comment

0 Comments