आलापल्ली येथे वन विभागात दिव्याखाली अंधार. झाली हरणाची शिकार मटन खाल्ले वाटून

Breaking news

आलापल्ली येथे वन विभागात  दिव्याखाली अंधार.
झाली हरणाची शिकार मटन खाल्ले वाटून 
 
उपवनसंरक्षक दिपाली तलमले यांचा जोर का झटका.... दोन कर्मचारी ताब्यात.... 



आलापल्ली,
 सध्या वनांचे व वन्य प्राण्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी वनाधिकाऱ्यांवर आहे अशी बिरुदाली वनविभाग मिरवत  असते परंतु आलापल्ली एफ डी सी एम  विभागात कुंपणच शेत खात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे..
एफ डी सी एम च्या काही कर्मचाऱ्यांनी हरणाचे मटण  शिजवून खाल्ल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वनविभागाने दोन आरोपींना अटक केल्याची माहिती समोर येत असून उपवनसंरक्षक कार्यालय आणि वन विभागाचे वरिष्ठ कार्यालय आलापल्लीत स्थित असूनही वन विभागाचे कर्मचारी जर असा प्रकार करत असेल तर सामान्य जनतेने कोणाकडे पहावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. उपवनसंरक्षक दिपाली तलमले यांनी प्रभार स्वीकारताच वन्यजीवांचे व वन तस्करीचे प्रमाण कमी होईल अशी नागरिकांना मोठी अपेक्षा होती. या अपेक्षेवर खरे उतरत त्यांनी सरळ 'त्या' हरणाचे मटन शिजवून खाणाऱ्या कर्मचाऱ्यावर कडक कारवाई केली आहे. मटन शिजवून खाण्याच्या प्रकरणात अनेक कर्मचारी गुंतले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे परंतु हा प्रकार एखाद्या कनिष्ठ कंत्राटी कर्मचाऱ्यावर लादून आपण मोकळे होण्याचा प्रयत्न एफ डी सी एम च्या कर्मचाऱ्यांकडून होत असल्याची ही चर्चा सुरू आहे. या प्रकरणात किती मोठे मासे अडकले आहेत याचाही तपास होणे गरजेचे आहे. या संपूर्ण प्रकरणात वन विभाग कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
 सदर प्रकरणाची सविस्तर माहिती थोड्याच वेळात

Post a Comment

0 Comments