भामरागड तालुक्यातील विविध गावांत हिवताप नियंत्रणाकरिता जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट health




गडचिरोली , जिल्हयात वाढते हिवतापाचे प्रमाण लक्षात घेता शासानाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार दिनांक १ डिसेंबर ते १५ जानेवारी या कालावधीमध्ये मिशन मलेरिया मोहिम राबविण्यात आली. भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम कवंडे, नेलगुन्डा, मेडदापल्ली या गावात हिवतापाचे प्रमाण अधिक असल्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दावल साळवे यांनी भेट दिली. यावेळी तेथील रुग्णांची आरोग्य तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले. तसचे गावातील लोकांना हिवतापापासून कसे सुरक्षित राहता येणार आहे याबाबतची माहिती कवंडे गावातील लोकांना देण्यात आली. गावामध्ये सध्या हिवतापचे रुग्ण जास्त असल्यामुळे प्राथमिक आरोग्य
केंद्र, तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांनी आरोग्य सेवक निहाय
आढावा घेतला. कोणताही ताप असेल तरी, रक्त तपासणी सर्व लोकांनी करून घ्यावी. तसेच आरोग्य कर्मचारी यांनी दुषीत रुग्ण हिवतापाचा पुर्ण डोज घेतो किंवा नाही याबाबत खात्री करावी. गप्पी मासे सोडणे, उपकेन्द्र स्तरावर गप्पी मासे केन्द्र स्थापित करणे. लोकांना मछरदाणीचा वापर करण्यास प्रवृत्त करणे, इत्यादी बाबत मार्गदर्शन केले.

कवंडे हे गाव छत्तीसगड सीमेला लागुण असल्यामुळे या गावामध्ये सर्व लोक लहान कामाकरिता छत्तीसगड येथे ये-जा करीत असताता. त्यामुळे सुद्धा गावामध्ये हिवतापाच्या रुग्णांत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत येत नाही. कवंडे गावातील हिवतापाच्या रुग्णेत वाढ होत असल्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सतत ३ दिवस सर्वेक्षण करण्याबाबत सुचित केलेले आहे. तसेच जिल्हास्तरावरुन आरोग्य तपासणी चमु पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा अरोग्य अधिकारी यांनी यावेळी सांगीतले. या प्रसंगी जिल्हा सर्वेक्षण
अधिकारी डॉ.विनोद मशाखेत्री, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भुषण चौधरी, डॉ.कुणाल मोडक हे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments