वाघेडा येथे विज पडून दोन मैशी ठार




वाघेडा येथे विज पडून दोन मैशी ठार

भूमिहीन शेतकरी मारोती मळकाम यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
मा. आमदार कृष्णा गजबे यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन दिला धीर सर्वोतोपरी आर्थिक मदत मिळवून देण्या करिता प्रयत्न करणार

कुरखेडा: आज दुपारी १:३० वजेच्या सुमारास कुरखेडा तालुक्यातील वाघेडा येथील भूमिहीन पशू पालक  मारोती काशिराम मडकाम  यांच्या मालकीचे दोन गरोदर म्हशीवर वीज पडल्याने दोन  म्हशी  जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.
मडकाम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून ह्या भूमिहीन शेतमजूरला आर्थिक मदत शासनाकडून मिळावी या करिता वाघेडा वासीयानी माजी आमदार कृष्णा गजाबे यांना माहिती दिली असता माजी आमदार कृष्णा गजबे यांनी तात्काळ वाघेडा येथे मारोती मडकाम यांची भेट घेवून त्यांना धीर दिला व शासनाच्या योजने अंतर्गत आपण सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देवून कुरखेडा येथील पशू वैधकिय अधिकारी व तलाटी यांना सूचना करून पंचनामा करण्याचे आदेश दिले आहे.
भूमिहीन मारोती मडकाम यांनी घरच्या शेळ्या विकून १ म्हेश ८० हजार रुपयाची विकत घेतली व त्या म्हशी पासून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांनी दुसरी म्हेश  ९० हजाराची घेवून कुटूबाचा उदर निर्वाह करीत होता.
परंतु आज नियतीने डाव टाकून त्यांचा सुखाच्या संसारात विघ्न आणण्याचे काम केल्याने कुटूब दुःख सागरात लोटला आहे. यावेळी मडकाम कुटूबियाना धीर देण्यासाठी माजी आमदार कृष्णा गजबे, भाजपा तालकाध्यक्ष चांगदेव फाये, आंधळी येथील तलाठी विपुल जगदाळे, तालुका पशू वैधकीय अधिकारी व गावकरी यांनी भूमीहीन मारोती मडकाम व यांच्या पत्नीला समजावून धीर देत होते.


Post a Comment

0 Comments