देलनवाडीवासीयांना मिळणार पिण्याचे शुद्ध पाणी

देलनवाडीवासीयांना मिळणार पिण्याचे शुद्ध पाणी


आरमोरीः- आरमोरी
तालुक्यातील देलनवाडी ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांना आरो प्लॉटच्या माध्यमातून पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार आहे.
नागरीकांना शुद्ध पेयजल मिळावे यासाठी प्रधानमंत्री खनिज विकास निधीतून 'जल शुध्दीकरण व शितकेंद्र प्लांट' मंजूर करण्यात आले आहे. सदर काम जलद गतीने पूर्ण झाले असून आज दिनांक १६ मे २०२५ रोजी या 'जल शुद्धीकरण व शितकेंद्र प्लांटचे लोकार्पण आरमोरी विधानसभा
क्षेत्राचे माजी आ. कृष्णा गजबे यांच्या हस्ते पार पडले.
या लोकार्पण प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव नंदू पेट्टेवार, सरपंचा प्रियंक कुमरे, मिनेश्वरी जांभुळे, माणिक पेंदाम, प्रकाश लेनगुरे, रामहरी चौधरी, दिलीप कुमरे, रोहिदास कुमरे, विजय नेवारे, कबिरादास कुंभळलकर, राहुल धाईत तसेच ग्रामपंचायत येथील सर्व पदाधिकारी व कर्मचारी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments