गडचिरोली नगरपरिषदभाजपाच्या उमेदवार प्रणोती सागर निंबोरकर गडचिरोलीच्या परिवर्तनाची नवी आशा, नवा विकासाभिमुख संकल्पना!

गडचिरोली नगरपरिषद
भाजपाच्या उमेदवार प्रणोती सागर निंबोरकर गडचिरोलीच्या परिवर्तनाची नवी आशा, नवा विकासाभिमुख संकल्पना!
गडचिरोली ,
गडचिरोली, परंपरा आणि संघर्षांनी घडलेली ही भूमी…
इथे प्रत्येक नागरिकाच्या मनात एकच स्वप्न—
आपलं शहर सुंदर, सुरक्षित, आधुनिक आणि सर्वसमावेशक असावं!
हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या वर्षीची नगरपरिषद निवडणूक निर्णायक ठरत आहे.
आणि या निर्णायक क्षणी गडचिरोलीकरांसमोर एक उपयुक्त, सक्षम, अभ्यासू व संवेदनशील नेतृत्व उभं आहे
भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार —प्रणोती सागर निंबोरकर!
ही फक्त एक उमेदवार नाहीत…
तर गडचिरोलीच्या आशांचा दीप, बदलाची दिशा, आणि विकासाची खात्री!
प्रणोती निंबोरकर — शिक्षण, संस्कार, आणि सेवाभाव यांची उत्तम जोड
आजच्या काळात शहर चालवणं म्हणजे फक्त पद नव्हे…
तर ज्ञान, संवेदनशीलता, लोकांचा विश्वास आणि विकासाची स्पष्ट दृष्टी.
प्रणोती निंबोरकर या चारही गुणांनी समृद्ध आहेत.
 १) उच्चशिक्षित व अभ्यासू नेतृत्व
शहराच्या प्रत्येक प्रश्नावर त्यांचा सखोल अभ्यास—रस्ते असोत, पाणी समस्या, महिलांची सुरक्षा, युवकांचे प्रश्न किंवा शहराचे नियोजन.
ज्यांनी शहराच्या वर्तमानाला समजून घेतलं आणि भविष्यासाठी योग्य दिशा दिली, अशा नेतृत्वाची आज गडचिरोलीला नितांत गरज आहे.
 २) सामाजिक कार्यात सातत्य — प्रत्येक घटकांशी भावनिक नातं
गडचिरोलीतील शोषित, वंचित, सामान्य घटकांच्या घरी जाऊन
त्यांच्या समस्या ऐकणे, सोडवण्याचा प्रयत्न करणे,
महिलांशी मायेचा संवाद,
युवकांना प्रेरणा,आणि सर्वसामान्य नागरिकांसोबत खांद्याला खांदा लावून काम करण्याची ओळख त्यांची जुनाट आहे.
३)  शोषित-वंचित घटकांसाठी काम करण्याचा ध्यास
शहरात काही घरे दिवसभर उजेडाची वाट पाहतात,
काही कुटुंबं पाण्याच्या टॅंकरची,
काही युवक संधीची,
काही महिला सुरक्षिततेची…
या सर्व घटकांपर्यंत वेळेत पोहोचून त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत नेण्याचं धैर्य आणि संवेदनशीलता फक्त प्रणोती ताईंमध्ये दिसते.
४) गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी स्पष्ट संकल्पना
त्यांच्या नेतृत्वाखाली पुढील योजना गतीने पुढे येऊ शकतात
स्वच्छ, हिरवागार आणि सुशोभित गडचिरोली
उत्तम दर्जाचे रस्ते,प्रकाशव्यवस्था व पाणीपुरवठा,शहरातील वाहतूक, बाजारपेठ व पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण , महिलांसाठी सुरक्षितता, हेल्पलाईन आणि सुविधा,युवकांसाठी रोजगाराभिमुख प्रकल्प
झोपडपट्टी व वंचित वस्तींसाठी वेगळे विकास आराखडे
डिजिटल, पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन
सर्वसामान्य कुटुंबांच्या दारी सरकारी योजना
तरुण व ऊर्जावान नेतृत्व म्हणून त्या गडचिरोलीला एका नवीन विकासयुगात नेऊ शकतात.
गडचिरोलीकरांनो! आता तुमचा एक निर्णय शहराचा चेहरा बदलू शकतो
प्रत्येक घराला विचारणारा एक प्रश्न आहे—
आपल्या मुलांच्या भविष्यासाठी योग्य नेतृत्व कोण?
या प्रश्नाचे उत्तर अढळपणे एकच
प्रणोती सागर निंबोरकर!
त्यांच्या विजयानं—
 गडचिरोली जिंकेल,विकास जिंकेल,नागरिकांचा विश्वास आणि स्वप्ने जिंकतील
नागरिक जनता बांधवांना मनापासून आवाहन
गडचिरोलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी,
आपल्या परिवाराच्या सुरक्षित भविष्यासाठी,
आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी —
भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार
प्रणोती सागर निंबोरकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करा!
आपले एक मत —
गडचिरोलीला नवा अध्याय, नवा विकासमार्ग, नवी ओळख देऊ शकते.
 जय हिंद! जय महाराष्ट्र!
विकासाच्या प्रवासात साथ द्या — प्रणोती निंबोरकर यांना विजयी करा!
   लेखन कर्ते :
दिवाकर रामदास गेडाम
मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांचे सहाय्यक तथा सोशल मीडिया प्रमुख  9673757718 ,    9370499136

Post a Comment

0 Comments