सुष्मीत कौर दहावीच्या परीक्षेत ९६.८० टक्के गुण प्राप्त करत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला

सुष्मीत कौर दहावीच्या परीक्षेत ९६.८० टक्के गुण प्राप्त करत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला


गडचिरोली,

आलापल्ली येथील ग्लोबल मिडिया केरला मॉडेल इंग्लिश मीडियम शाळेची विद्यार्थिनी तथा डॉ. चरणजितसिंह सलूजा यांची पुत्री सुष्मीत कौर हिने दहावीच्या परीक्षेत ९६.८० टक्के गुण प्राप्त करत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

सुष्मीतची ही शैक्षणिक घोडदौड केवळ वैयक्तिक यश नसून आलापल्लीसारख्या भागातील विद्यार्थ्यांसाठी नवी प्रेरणा व आशा देणारी आहे. तिच्या यशामुळे तिच्य शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून शिक्षकवर्ग, पालक आणि समाजातील सर्वच स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अभ्यास, शिस्त, चिकाटी व परीश्रमाचा उत्तम संगम असलेली सुष्मीत ही नेहमीच अभ्यासू आणि शिस्तप्रिय विद्यार्थिनी म्हणून ओळखली जाते. अभ्यासात सातत्य, वेळेचे योग्य नियोजन आणि ऑनलाइन शिक्षणातूनही शैक्षणिक उंची गाठण्याचा तिचा प्रयत्न अखंड सुरू होता. ग्लोबल मिडिया केरला मॉडेल इंग्लिश मीडियम शाळेमधील शिक्षकांनी तिला योग्य मार्गदर्शन केले. मुख्याध्यापकांनी तिच्या मेहनतीचे कौतुक करत सांगितले की, “सुषमीतचे यश हे केवळ तिच्या मेहनतीचेच नव्हे, तर आमच्या संपूर्ण शैक्षणिक पद्धतीचे फळ आहे.” सुषमीतच्या यशामध्ये तिच्या आई-वडिलांचाही मोलाचा वाटा आहे. आई आणि वडील हे दोघेही डॉक्टर असून जिल्हाभरात सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. सुष्मीतनेसुद्धा शालेय यशातून आपले कर्तृत्व दाखवून दिले आहे. आई-वडिलांनी सदैव “तू शिक आणि मोठी हो, आम्ही तुझ्यामागे आहोत,” या शब्दांनी तिला मानसिक बळ दिले. वैद्यकीय क्षेत्रात जाऊन समाजसेवा करायची सुष्मितची इच्छा असून तिलासुद्धा पालकांप्रमाणेच डॉक्टर होऊन समाजकार्य करायचे आहे. सुष्मित कौरच्या य घवघवीत यशाबद्दल बलराम सोमनाणी यांनी तिचे विशेष कौतुक केले आहे. इयत्ता दहावीच्या परीक्षेत सुष्मित कौरने प्राविण्य प्राप्त करून आपल्या कुटुंबासोबतच गावाचेही नाव उज्ज्वल केले आहे, असे सांगत बलराम सोमनाणी  यांनी तिचे भरभरून कौतुक करत अभिनंदन केले. तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत

Post a Comment

0 Comments